शास्त्रशुद्ध वास्तुशांती कशी करावी

शास्त्रशुद्ध वास्तुशांती कशी करावी

१) आग्नेय, नैऋत्य किंवा ईशान्य या पवित्र- दिशांपैकी एका दिशेला वास्तुप्रतिमेची स्थापना करावी. ती जागा पायदळी तुडवली जाऊ नये वा अपवित्र स्थळी असू नये.
२) वास्तुदेवतेची प्रतिमा सोन्याच्या जाड पत्र्याची असावी.
३) वास्तूची मालकी एखाद्या विधवा स्त्रिकडे असेल, तर तिने पुरोहितांच्या मदतीने वास्तुशांती करावी, पुरोहितांनी तिला देवतांची पंचोपचारपूजा, द्रव्यत्याग व वराहुती इ. शक्य त्या विधींमध्ये तिला अगत्यपूर्वक सहभाग द्यावा.
४) वास्तुशांतीच्या दिवशीच सत्यनारायणाची पूजा ठेवू नये. कारण त्यामुळे वास्तुशांतीला दुय्यम महत्व येते.
५) स्वत: च्या फ्लॅटची वास्तुशांती करताना सूत्रबंधन, आठ दिशांना द्रोणांतून दहीभात ठेवणे, जमिनीत खिळे ठोकणे व घराभोवती दूधपाण्याच्या धारा धरणे या गोष्टी वर्ज्य केल्या तरी चालतील.
६) घर बांधल्यावर वास्तुशांती करुन मगच गृहप्रवेश करता येतो, ही संकल्पना चुकीची आहे. नवीन घरात दिनशुद्धी पाहून गृहप्रवेश केल्यावर वास्तुशांती सवडीने केली तरी चालते.
७) एकाच मालकाचे सलग दोन फ्लॅट असून, त्यांच्यात अंतर्गत दरवाजा असेल, तर दोन्हींची मिळून एक वास्तुशांती करता येते. तसा दरवाजा नसेल किंवा दरवाजा असूनही भिन्न मालकांकडे दोन्ही फ्लॅटची मालकी असेल, तर प्रत्येक फ्लॅटची स्वतंत्रपणे वास्तुशांती करावी.
८) फ्लॅटची वास्तुशांती करताना सूत्रवेष्टन व गृहप्रदक्षीणा करण्याची आवश्यकता नसते.
९) उदकशांती हा वास्तुशांतीचा पर्याय होऊ शकत नाही. कारण दोन्हींची उद्दिष्टये वेगवेगळी आहेत.
१०) अतिशय प्रसन्न व उत्साही वातावरणात वास्तुशांतीचा विधी पार पाडावा.

1 Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *