आहार सेवनाविषयीचे मुख्य नियम

आहार सेवनाविषयीचे मुख्य नियम

आहार सेवनाविषयीचे मुख्य नियम
अन्न नेहमी ताजे ताजे व गरम गरम जेवावे. असे अन्न रूपरंगाने स्वादिष्ट तर असतेच शिवाय लवकर व चांगले पचते. तसेच अन्नाच्या उष्ण गुणाने वातही सरण्यास मदत होते. अन्न पोटात गेल्यावर कपफदोषाचे नैसर्गिकरित्या प्रमाण वाढते. उष्ण अन्नसेवनाने काही अंशी या वाढणाऱ्या कफावरही नियंत्रण ठेवण्यास मदत होते. फारच थंड वा फारच गरम अन्न मात्र कधीच खाऊ नये.
अगदी कोरडे अन्न वा तेलातुपाने नुसते माखलेलेही अन्न खाऊ नये. अगदी कोरडे म्हणजेच रूक्ष अन्न खावयास तर त्रास होतोच पण पचावयास देखिल त्रास होतो. स्निग्ध अन्न रुचकर तर असतेच शिवाय पाचकरसांमध्येही वाढ करते. त्यामुळे अन्न लवकर व चांगले पचते. तसेच अन्नाच्या स्निग्ध गुणाने वातही सरण्यास मदत होते. शरीराचे बल वाढते व पोषणही उत्तमरित्या होते. इंद्रिये प्रसन्न राहतात.
अन्नाचे प्रमाण भूक व पचनशक्ती यांच्या अनुमानाने योग्य तेवढे जर ठेवले तर त्रिदोषांना कोठेही न बिघडविता तीनही दोषांचे योग्य असे पोषण करण्यात ते सक्षम ठरते. जेव्हा कोणताही त्रास न होता अन्नपचन अगदी सुलभतेने होते, मलमूत्रविसर्जन सुखाने होते, पाचनसंस्था कोठेही न बिघडता आरोग्य
राखण्यास मदत करते तेव्हा ओळखावे की आपण घेतलेले अन्नाचे प्रमाण योग्य असले पाहिजे.
अजून एक अत्यंत महत्वाचा नियम म्हणजे भूक लागल्याशिवाय नये. भूक लागणे हे आधीचे जेवण पचले आहे असे समजण्याचे साधन आहे.
आधी खाल्लेले अन्न नीट पचल्याखेरीज जेवू नये. हा नियम जर पाळला नाही तर अर्धवट पचलेले अन्न अजुन पोटात असतांनाच नवे अन्न पोटात पडल्याने अन्नपाचक रसांना, आतडयांना ताण येतो व पचनसंस्था बिघडते.किती प्रमाणात जेवावे ?
दोन परस्परविरुध्द अशा प्रकारचे अन्न एकाच वेळी वा एकामागून एक असे खाऊ नये. उदा. गरमागरम पुरीबरोबर फ्रीजमधील थंडगार अशी बासुंदी वा श्रीखंड खाऊ नये. किंवा गरम चहा प्यायल्यावर लगेच गार सरबत पिऊ नये. अशाने रोगांना आमंत्रण मिळते.
अप्रिय अशा वा भीषण वाटू शकणाऱ्या जागी बसून जेवू नये. उदा. स्मशान, शौचगृह इ. तसेच आपल्या आवडत्या ठिकाणी आपल्याला योग्य वाटेल, रुचेल अशाच भांडयांचा ताटवाटयांचा उपयोग जेवण्याच्या वेळी करावा. याने जेवतांना मानसिक समाधान राहते.
खूप भरभर असे वा बकाबक जेवू नये. अशाने ठसका लागण्याचा संभव निर्माण होतो व अन्नाचा तिटकारा वाटण्याची शक्यता देखिल निर्माण होते. यामुळे त्रिदोष बिघडतात व रोगनिर्मितीस मदत होते.
यासाठी जेवणासारखी अत्यंत महत्वाची गोस्थ पूर्णपणे लक्ष देवून स्वतःसाठी काय योग्य काय अयोग्य याचा विचार करून प्रसन्न मनाने करावी.
अति सावकाश रेंगाळतदेखिल जेवू नये. असे केल्यास जेवण तर गार होतेच, पचन मंदावते, भूक नीट भागत नाही व जेवणाचे समाधानही होत नाही.
जेवतांना हसणे, बोलणे अशा क्रिया शक्यतो टाळाव्यात. हल्ली तर टी. व्ही चालू असतांना त्याच्या समोर जेवण्याचीच पद्धत घराघरात दिसून येते. यामुळे त्रिदोष बिघडतात व रोगनिर्मितीस मदत होते.
यासाठी जेवणासारखी अत्यंत महत्वाची गोष्ट पूर्णपणे लक्ष देऊन स्वतः साठी काय योग्य काय अयोग्य याचा विचार करून प्रसन्न मनाने करावी.

1 Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *