पूर्व दिशा: अरुणोदयाची दिशा. पूर्व दिशा पितृ स्थान सूचक आहे. म्हणूनच पितरांची उपासना या दिशेकडे तोंड करून करावी. पूर्व दिशा सूर्यकिरणांचे प्रवेशद्वार आहे. त्यामुळे वास्तूची पूर्व दिशा रिकामी असावी. या दिशेचा स्वामी इंद्र आहे. पूर्व दिशेला अग्नी तत्व प्रभावित असते.
पश्चिम दिशा: ही दिशा सूर्यास्ताची आहे. वरुण किवा वायु ही देवता पश्चिम दिशा प्रमुख आहे. वायुतत्वाचा या दिशेवर प्रभाव आहे. ह्या दिशेस सुख समृद्धीचे प्रतिक मानतात. या दिशेत वायू चंचल व प्रसन्न असतो. म्हणून पाश्चिमाभिमुख वास्तूतील लोक प्रसन्न व विनोदप्रिय असतात.
उत्तर दिशा : उत्तर दिशा मातृभावदर्शक आहे. या दिशेला रात्री ध्रुवतारा दिसतो. याच दिशेला जलतत्वाला स्थान आहे. उत्तराभिमुखी वास्तूवर लक्ष्मी ची सदा कृपा राहते. त्यामुळे धन-धन्य समृद्धी प्राप्त होते. उत्तर दिशेने येणारा प्रकाश वास्तूला लाभदायक असतो.
दक्षिण दिशा: या दिशेला पृथ्वी तत्वाने व्यापले आहे. या दिशेवर यमाचे स्वामित्व आहे. म्हणूनच मुक्ती प्रदान करणारी दिशा असे या दिशेला म्हणतात. दक्षिण मुखी घरात व्यक्तींना ध्यैर्य व स्थिरता प्राप्त होते. काहींच्या मते दक्षिणाभिमुखी वास्तू असणे अशुभ मानले जाते.
ईशान्य दिशा: उत्तर व पूर्व या दोन दिशांच्या मध्ये जो कोन (कोपरा) असतो, ती दिशा ईशान्य दिशा. चारही उपदिशांमध्ये ईशान्य ही दिशा. चारही उप दिशांमध्ये ईशान्य ही दिशा पवित्र मानली जाते. म्हणूनच या दिशेला आराधना, साधना, विद्यार्जन, लेखन इत्यादी बाबतीत शुभकारक मानतात. ईशान्य कोपरा माणसाला बुद्धी, ज्ञान, विवेक,धैर्य साहस प्रदान करतो. म्हणून घरातील हा कोपरा सदैव स्वच्छ व पवित्र ठेवावा
आग्नेय दिशा: दक्षिण व पूर्व या दोन दिशा चा मध्ये येणारा कोपरा आग्नेय या उपदिशेचा दर्शक आहे हा स्वाथ्यप्रदात आहे. यात अग्नीतत्व स्थिर मानले आहे. घरात आग्नेय कोपऱ्यात घाणेरडी वस्तू असेल तर लोकांचे आरोग्य बिघडते.ह्या आग्नेय कोपऱ्यात विजेची व अग्नीची अग्नीची उपकरणे तसेच लोखंडी वस्तू ठेवणे फायदेशीर आहे.
नैऋत्य दिशा : दक्षिण व पश्चिम या मुख्य दिशेंमधील कोपरा म्हणजे नैऋत्य दिशा. ही दिशा शत्रुनाशक आहे. या दिशेच्या अयोग्य वापरणे मनुष्य अकाल मृत्यू ग्रस्त होतो. घरामध्ये नैऋत्य दिशेला दुषित वस्तू ठेवल्यास घरातील व्यक्तीचे चारित्र्य दुषित बनते व शत्रू प्रबल होतो. तसेच घरात अनेक अडचणी, भूत प्रेत आदि बाधा निर्माण होतात.
वायव्य दिशा: उत्तर व पश्चिम या मुख्य दिशांमधील कोपरा हीच वायव्य दिशा. ही दिशा शुभ फलदायी आहे. माणसाला दीर्घायू स्वास्थ्य व शक्ती प्राप्त होते. हा कोपरा दुषित ठेऊ नये. त्यामुळे पिडा उद्भवतात. मित्र देखील शत्रू बनतात. वायव्य दिशा दुषित ठेवल्यास घरातील मुख्य व्यक्ती अहंकारी होतो. घर शुभ फळ प्राप्तीसाठी वायव्य दिशा स्वच्छ व पवित्र ठेवावी.